MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
MahaDBT Yojana या शेतकऱ्यांचे अर्ज होणार बाद; पूर्वसंमती होणार रद्द
Read More
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर
Read More
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.
मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार.
Read More
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.
आता घरीच तयार होणार, 10:26:26: आणि DAP खत पहा सविस्तर माहिती.
Read More
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 1500 नाही तर थेट 4500 रुपये मिळणार, पण कधी? जाणून
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 1500 नाही तर थेट 4500 रुपये मिळणार, पण कधी? जाणून
Read More

हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन

हरभरा पीक पाणी व्यवस्थापन: गजानन जाधव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन ; हरभरा हे पीक पाण्यासाठी अत्यंत संवेदनशील मानले जाते, त्यामुळे त्याचे पाणी व्यवस्थापन अत्यंत विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार, हरभऱ्याला पाणी देताना पिकाची अवस्था आणि जमिनीचा ओलावा लक्षात घेणे गरजेचे असते. पेरणीपासून ते फूल लागण्यापूर्वीच्या काळात तुम्ही गरजेनुसार कधीही पाणी देऊ शकता. मात्र, फूल लागण्याच्या सुरुवातीच्या काळात पाणी देणे फायद्याचे ठरते. शक्यतो पीक पूर्णपणे फुलोऱ्यात असताना पाणी देणे टाळावे, परंतु जर जमिनीला खूप भेगा पडत असतील आणि पाण्याचा ताण पिकाला सहन होत नसेल, तर अशा वेळी पिकाचे नुकसान टाळण्यासाठी हलके पाणी देणे गरजेचे आहे.

ADS किंमत पहा ×

पाणी देण्याच्या पद्धतीबद्दल बोलताना गजानन जाधव सांगतात की, अनेक शेतकऱ्यांच्या मनात अशी भीती असते की स्प्रिंकलरने (तुषार सिंचन) पाणी दिल्यास झाडांवरील ‘आम’ वाहून जाते. परंतु, यामध्ये घाबरण्याचे काहीही कारण नाही, कारण एकदा आम वाहून गेली तरी दुसऱ्या दिवशी ती पुन्हा तयार होते. जर तुम्हाला हलके पाणी द्यायचे असेल तर स्प्रिंकलरचा वापर करणे उत्तम आहे. यासाठी दोन तासांची वेळ पुरेशी ठरू शकते. याउलट, जर तुम्हाला पिकाला भरपूर पाणी द्यायचे असेल, तर तुम्ही पारंपरिक पाटाने किंवा दांडाने पाणी देऊ शकता.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment