Namo yojana 2025 ; महासन्मान निधी योजना: लाभार्थी संख्या आणि निकषांचे ताजे अपडेट. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येबद्दल आणि हप्ता जमा होण्याच्या तारखेबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे की निकषांमुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटत आहे. २० वा हप्ता सुमारे ९६ लाख शेतकऱ्यांना मिळाला होता, मात्र २१ व्या हप्त्यात ही संख्या घटून ९२ ते ९३ लाखांवर आली. आता नमोचा आठवा हप्ता ९० लाख ४१ हजार २४१ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
या योजनेतून मोठ्या प्रमाणात शेतकरी वगळले जाण्यामागे सरकारने लागू केलेले नवीन कठोर नियम आहेत. वगळलेल्यांमध्ये मृत लाभार्थी (सुमारे २८ हजार) आणि दुहेरी लाभार्थी (सुमारे ३५ हजार) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, कुटुंबातील रेशन कार्डावर आधारित फक्त एकाच व्यक्तीला लाभ दिला जात आहे, ज्यामुळे नवरा-बायको दोघांच्या नावाने लाभ मिळणाऱ्या कुटुंबांना फटका बसला आहे.












