फुले ऊस १५००६ : सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन देणाऱ्या नवीन वाणाचे सविस्तर वैशिष्ट्ये
फुले ऊस १५००६ : सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन देणाऱ्या नवीन वाणाचे सविस्तर वैशिष्ट्ये
Read More
मछिंद्र बांगर हवामान अंदाज ; जानेवारी ते मार्च सविस्तर अंदाज.
मछिंद्र बांगर हवामान अंदाज ; जानेवारी ते मार्च सविस्तर अंदाज.
Read More
नया पश्चीमी विक्षोभ, ईन राज्यो मे होगी भारी बारीश..IMD का अलर्ट
नया पश्चीमी विक्षोभ, ईन राज्यो मे होगी भारी बारीश..IMD का अलर्ट
Read More
गहू की फसल में कल्लों (फुटवा) की संख्या बढ़ाने के वैज्ञानिक और व्यावहारिक तरीके
गहू की फसल में कल्लों (फुटवा) की संख्या बढ़ाने के वैज्ञानिक और व्यावहारिक तरीके
Read More
95℅ अनुदानावर सोलर, छतावरील ‘स्मार्ट सोलर योजने’साठी अर्ज मंजुरी प्रक्रिया सुरू
95℅ अनुदानावर सोलर, छतावरील ‘स्मार्ट सोलर योजने’साठी अर्ज मंजुरी प्रक्रिया सुरू
Read More

Farmer loan waiver ; शेतकऱ्यांने सावकारी कर्जसाठी विकली किडनी.

Farmer loan waiver ; शेतकऱ्यांने सावकारी कर्जसाठी विकली किडनी. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील शेतकरी रोशन कुडे यांची ही अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक कहाणी आहे. रोशन कुडे यांच्याकडे चार एकर शेती असून त्यांनी जोडधंदा म्हणून बारा दुधाळ गाई खरेदी केल्या होत्या. बँकांकडून वेळेवर कर्ज न मिळाल्याने त्यांनी दोन सावकारांकडून प्रत्येकी पन्नास हजार असे एकूण एक लाख रुपये कर्ज घेतले. मात्र, दुर्दैवाने त्यांच्या गाईंना लंपी आजाराची लागण झाली आणि मोठ्या प्रमाणावर खर्च करूनही त्या दगावल्या. यामुळे त्यांच्यावर असलेल्या कर्जाचा बोजा वाढत गेला आणि सावकारांनी वसुलीसाठी त्यांच्याकडे तगादा लावला.

ADS किंमत पहा ×

सावकारांकडून होणारा अपमान आणि धमक्यांना कंटाळून रोशन कुडे यांनी सुरुवातीला आपली दोन एकर जमीन आणि ट्रॅक्टर विकला. इतकेच नाही तर त्यांनी पत्नीचे दागिने आणि घरातील इतर साहित्य विकूनही सावकारांचे कर्ज फिटले नाही. अवघ्या एक लाख रुपयांचे कर्ज व्याजामुळे वाढत जाऊन तब्बल ७४ लाख रुपयांपर्यंत पोहोचले. या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी सावकारांनी त्यांना किडनी विकण्याचा अघोरी सल्ला दिला. हतबल झालेल्या कुडे यांनी अखेर आपल्या कुटुंबाच्या सुटकेसाठी स्वतःची किडनी विकण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment